नाशिक : देवळाली लष्करी छावणी परिसरातील सैनिकांचे स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या एका खासगी वेबसाईटच्या महिला पत्रकारावर देवळाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या महिलेनं स्टींग ऑपरेशन करून लष्करातील अव्यवस्था मांडल्याने एका जवानानं आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकऱणात या महिलेच्या नावाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
तसंच या महिलेनं अतिसंवेदनशील असलेल्या परिसरांत जाऊन स्टींग ऑपरेशन केले होते.