महेश पोतदार , उस्मानाबाद : अपंगांच्या आंदोलनात मागण्याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या 'अपंग प्रहार क्रांती सेने'चे आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे..
'दोन टक्क्यांची नोकरी... पैसे देवून लागला का XXXX, चुप बस XXX... बाहेर हो...' अशा अर्वाच्य शब्दांत बच्चू कडू यांनी कर्तव्य बजावत असणाऱ्या एका ट्रेनी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केलीय... आणि हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.
उल्लेखनीय म्हणजे, राजकीय गुंडगिरीला आणि झुंड शाहीला बळी पडत पोलिसांनी आत्तापर्यंत आमदार महाशयांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात हा प्रकार घडला आहे. अपंगांच्या मोर्चा नंतर आमदार बच्चू कडू हे मागण्याचे निवेदन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेले होते. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सीईओंच्या दालनात गर्दी केली होती. काही विपरीत प्रकार होऊ नये, म्हणून या गर्दीला दालना बाहेर काढण्याचे काम पोलीस अधिकारी करत होते. त्याचा राग आमदार साहेबांना आला. कार्यकर्त्यांसमोरच त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.