तिकीट कन्फर्म झाले नाही, आमदारांनी ट्रेन रोखून धरली

 तिकिट कन्फर्मच्या मुद्द्यावर आमदारांनी देवगिरी एक्सप्रेस ट्रेन रोखल्याची घटना आज नांदेड रेल्वे स्थानावर घडली. आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घातलेल्या वादामुळे ट्रेन  अजूनही नांदेड स्टेशनवर उभी आहे. तब्बल दोन तास लेट झाल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.  

Updated: Jun 15, 2015, 11:46 PM IST
तिकीट कन्फर्म झाले नाही, आमदारांनी ट्रेन रोखून धरली title=

नांदेड :  तिकिट कन्फर्मच्या मुद्द्यावर आमदारांनी देवगिरी एक्सप्रेस ट्रेन रोखल्याची घटना आज नांदेड रेल्वे स्थानावर घडली. आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घातलेल्या वादामुळे ट्रेन  अजूनही नांदेड स्टेशनवर उभी आहे. तब्बल दोन तास लेट झाल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.  

शिवसेना आमदार हेमंत पाटील, काँग्रेसचे आमदार डी पी सावंत, आमदार वसंत चव्हाण स्थानकावर यांनी देवगिरी एक्स्प्रेस रोखून धरली. मराठवाड्यातील हे आमदार मुंबईकडे निघाले होते. पण आमदार कोट्यातील त्याचे तिकीट कन्फर्म झाले नाही म्हणून या तिन्ही आमदारांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नांदेड स्टेशनवर ट्रेन रोखून धरली. 

आज सायंकाळी सहा वाजून १० मिनिटांची सिंकदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस मुंबईकडे निघायला सुरूवात झाली तेव्हा इंजिनच्या समोर तीन आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी आठमुठेपणा केला.  या तीन आमदाराचे मुंबईला जाण्याचे तिकीट कन्फर्म झाले नाही. त्यामुळे चिडलेल्या आमदारांनी आपल्या ताकदीचा वापर करत तब्बल दोन तास ही गाडी नांदेड स्थानकावर रोखून घडली. 

आमदारांच्या या प्रकारामुळे आता ही गाडी आणखी लेट होण्याची शक्यता आहे. नांदेड-मनमाड हा सिंगल ट्रॅक असल्यामुळे अनेक गाड्यांमुळे ही गाडी आणखी रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. औरंगाबादला ही गाडी रात्री ११ वाजता पोहचते, ती आता रात्री १ वाजता पोहचणार आहे. तसेच या लेट गाडीमुळे इतर गाड्यांचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे. 

ही गाडी सकाळी ७ च्या सुमारे मुंबईत पोहचते, पण आता लेटमुळे ही गाडी ४ तास लेट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.