नाशिक : नाशिकपाठोपाठ त्र्यंबकेश्वरमध्येही मनसेला धक्का बसला आहे. ७ नगरसेवक मनसेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.
या नगरसेवकांनी नाशिकचे माजी आमदार वसंत गीतेंसह जाण्याचा निर्णय घेतला आहे. या नगरसेवकांमध्ये नगराध्यक्षांचाही समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या मनसेला नाशिकमध्ये मोठं खिंडार पडण्याची शक्यात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौ-याच्या तोंडावर मनसेचे सरचिटणीस वसंत गीते आणि अतुल चांडक यांच्यासह जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
मनविसेच्या ८० टक्के पदाधिका-यांनीही आपल्या पदाचे राजीनामे सोपवले आहेत. नाशिकचे मनसेचे महापौर अशोक मुर्तडक यांनी मात्र गीते मनसेसोबतच असल्याचा दावा केलाय. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून
राजीनामा दिल्याचं सागितंलय. तसंच सर्व नगरसेवक मनसेसोबतच असल्याचाही दावा महापौरांनी केलाय. महापौरांनी घेतलेल्या मनसे नगरसेवकांच्या बैठकीत ३४ नगरसेवक हजर होते. गीत मात्र नॉट रिचेबल असल्यामुळं नाशिकमधलं राजकीय गूढ अधिकच वाढलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.