ठाण्यात मनसेची नागरिकांसाठी ई रिक्षा सुविधा

आगामी महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केलीय. त्यानुसार नागरिकांना मोफत सेवा-सुविधांचा लाभ देण्याची मोहीम पक्षाच्या कार्यकत्यांनी सुरु केली आहे. ठाण्यात मनसेने नागरिकांसाठी ई रिक्षा सुविधा सुरु केली आहे. 

Updated: Aug 11, 2016, 10:16 PM IST
ठाण्यात मनसेची नागरिकांसाठी ई रिक्षा सुविधा title=
संग्रहीत छाया

ठाणे : आगामी महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केलीय. त्यानुसार नागरिकांना मोफत सेवा-सुविधांचा लाभ देण्याची मोहीम पक्षाच्या कार्यकत्यांनी सुरु केली आहे. ठाण्यात मनसेने नागरिकांसाठी ई रिक्षा सुविधा सुरु केली आहे. 

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते आज या सेवासुविधेचा शुभारंभ करण्यात आला. ठाण्यात पब्लीक ट्रान्सपोर्टची सुविधा अत्यंत खडतर असून या सेवाचा नागरिकांना निश्चित फायदाच होईल असा दावा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

ठाणे स्टेशन, तलावपाळी, गावदेवी या भागात ही सेवा नि:शुल्क उपलब्ध करण्यात येणार आहे. सध्या एक ई रिक्षा ताफ्यात दाखल झाली असून पुढच्या काळात आवश्यकतेनुसार त्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.