मुंबई : नैऋत्य मोसमी पावसानं मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून एक्झिट घेतल्याची माहिती हवामान खात्यानं दिलीय..
६ ऑक्टोबरपासूनच मान्सून महाराष्ट्रातून परतण्यास सुरुवात झाली होती.. मात्र अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं गेल्या आठवड्यात मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या..
मान्सून महाराष्ट्रातून बाहेर गेला हे अधिकृतरित्या जाहीर होण्याआधीच तापमानात प्रचंड वाढ झालीय.. ३० सप्टेंबरला तापमान ३७.४ अंश से. इतकं नोंदवण्यात आलंय.. पाऊस पडला नसल्यानं तापमानात वाढ झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय..
महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे ३० सप्टेंबर रोजी मान्सून परततो... गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतून मान्सूनच्या परतीचा प्रवास ऑक्टोबरपासून सुरु होतोय.. २००८ आणि २०१४ मध्ये १४ ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झालाय..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.