बदलापूरमध्ये भव्य मराठा मोर्चा

कोपर्डीप्रकरणी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीबरोबर अॅट्रोसीटी कायद्यात बदल करण्यासह विविध मागण्यांसाठी बदलापूरमध्ये आयोजित केलेल्या मोर्चात मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. 

Updated: Oct 10, 2016, 08:33 AM IST
बदलापूरमध्ये भव्य मराठा मोर्चा

बदलापूर : कोपर्डीप्रकरणी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीबरोबर अॅट्रोसीटी कायद्यात बदल करण्यासह विविध मागण्यांसाठी बदलापूरमध्ये आयोजित केलेल्या मोर्चात मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. 

बदलापूरच्या इतिहसातील हा सर्वात मोठा मोर्चा होता. बदलापूर पश्चिममधील रमेशवाडी येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जिजाऊंच्या लेकींनी पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली. रमेशवाडीपासून निघालेल्या या मोर्चाचे प्रतिनिधीत्व मुलीच्या हाती होते.