घरगुती वादातून सासूनं सुनेला भोसकलं

घरगुती कारणवारून सासुनं सुनेला चाक़ूनं भोसकल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यात घडलीय.

Updated: Apr 29, 2017, 06:14 PM IST
घरगुती वादातून सासूनं सुनेला भोसकलं  title=

चिपळूण : घरगुती कारणवारून सासुनं सुनेला चाक़ूनं भोसकल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यात घडलीय. यामध्ये सुनेचा मृत्यू झालाय. चिपळूण तालुक्यातील वालोपे गावात देउळवाडीत परी प्रशांत करकाळी आपल्या कुटुंबासह राहते.

परीची सासू रेणुका कारकाळेबरोबर काही कारणावरून भांडण झालं. यावेळी रागाच्या भरात सासुनं परी प्रशांत करकाळीच्या छातीत चाक़ूनं सपासप वार केले. यामध्ये परी प्रशांत कारकाळेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी परिच्या सासूला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतलंय.