पुणे : मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावर सातत्याने खंडाळा बोर येथे दरड कोसळत असल्याने येथील काम सुरु ठेवण्यासाठी ही वाहतूक बंद असणार आहे.
खंडाळा बोर घाटात अडोशी याठिकाणी दरड हटविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक जुन्या मार्गावरुन वळविण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्यांनी जुन्या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुंबईहून पुण्याकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक खालापूर टोल नाक्यावर ११ ते ४ या वेळेत थांबवली जाणार आहे. तर हलकी वाहतून जुन्या मार्गाने खोपोलीतून वळविण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीसाठी सध्या तरी कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.