मुंबई - पुणे रेल्वे वाहतूक १० तास उशिराने, पुणे लोकल ठप्प

पुण्यातील मावळ तालुक्यात काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा अजूनही विस्कळीत आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी मध्य रेल्वेची अप लाइन ठप्प असून या मार्गाने जाणाऱ्या ट्रेन १० तासाने उशिरा धावत आहे. 

Updated: Sep 19, 2015, 09:11 AM IST
मुंबई - पुणे रेल्वे वाहतूक १० तास उशिराने, पुणे लोकल ठप्प title=

लोणावळा : पुण्यातील मावळ तालुक्यात काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा अजूनही विस्कळीत आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी मध्य रेल्वेची अप लाइन ठप्प असून या मार्गाने जाणाऱ्या ट्रेन १० तासाने उशिरा धावत आहे. 

अधिक वाचा : डोंगराला भगदा पडल्याने बंद पडलेली मुंबई - पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक सुरु

मावळमध्ये काल दुपारी कामशेत ते वडगाव स्टेशन दरम्यान रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने ही सेवा विस्कळीत झाली आहे.  मुंबईकडून पुण्याकडे जाणारी मध्य रेल्वेची अप लाइन ठप्प आहे. या लाइनवरील अनेक गाड्या लोणावळा, खंडाळा, कर्जत या स्टेशन वर उभ्या आहेत. 

अधिक वाचा : मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प, रात्रभर रेल्वे सुरु करण्याचे काम

तर पुण्याहून मुंबईच्या दिशेने डाऊन लाइनने जाणाऱ्या रेल्वे ३ ते ४ तास उशिराने धावत आहेत. लोणावळा ते पुणे या लोकल सेवेला ही फटका बसला आहे. ही सेवा पूर्णपणे ठप्प आहे. पहाटेपासून आतापर्यंत केवळ एक लोकल पुण्याकडे रवाना झाली.

मुंबईकडे जाणारी अप लाइन पुढील २ ते ३ तासात सुरळीत होईल. मात्र, तर पुण्याकडे जाणारी डाऊन लाइन पूर्ववत होण्यासाठी किमान पाच ते सहा अथवा त्यापेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.