ठाणे : महाराष्ट्रातल्या तरुणाच्या मानगुटीवर बसलेलं आयसीसीसचं भूत काही केल्या उतरण्याचं नाव घेत नाहीय.
ठाण्याजवळच्या मुंब्र्यातून एक आणखी एक तरुण नुकताच आयसिसीसमध्ये सामील झाल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिलीय. मुंब्र्यातील 27 वर्षीय तबरेज तांबे असं त्याचं नावं आहे.
तरबेज हा इजिप्तमध्ये नोकरी साठी गेला. तिथे त्याचा अली नावाच्या तरुणांशी संपर्क झाला. अली हा आधीपासूनच सौदी अरेबियात राहत होता. अलीच्या प्रभावाखाली तबरेज तांबे लिबियात गेला. त्यानंतर आता तो आणि अली सिरियामध्ये आयसिसीसच्या कारवायांमध्ये सामील झाल्याचं पुढे आलंय.
विशेष म्हणजे आधीही कल्याणमधून चार तरुण आयसिससमध्ये समील झाल्याचंही पुढे आलंय. त्यामुळे आयसीसीसची पाळंमुळं किती खोलवर रुतली आहेत, याचा आता एटीएसकडून शोध घेतला जात आहे.