मुंबई : महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची आकाडेवारीत थोडी वाढ झाल्याने आता आधीच अत्यंत चुरशीच्या लढाईचा निकालही तितकाच अटीतटीचा लागण्याची शक्यता आहे. आता कल्याण-डोंबिवलीत ७५० उमेदवारांसाठी आणि कोल्हापूरच्या ५०६ उमेदवारांसाठी आजची रात्र वैऱ्याची आहे. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
अधिक वाचा : केडीएमसीत ४८ तर कोल्हापुरात ६४ टक्के मतदान, लक्ष निकालाकडे
मुंबई महापालिकेच्या निवडणूकांची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूरच्या निवडणूकांची मतदान प्रक्रिया आज पार पडलीय. दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय नसली तरी वाढ मात्र नोंदवण्यात आलीय. यंदा कल्याण-डोंबिवलीत संध्याकाळी साडेपाचपर्यंत अंदाजे ४८ टक्के मतदान झालंय. गेल्यावर्षीच्या तुलनेत दोन टक्के वाढ झालीय.
अधिक वाचा : केडीएमसी निवडणूक : सेना खासदार, आमदारांना नोटीस तर भाजपकडून आचारसंहितेचा भंग
तर कोल्हापुरात सकाळापासूनच मतदारांच्या मोठ्या रांगा बघायला मिळाल्या. त्याचं परिणाम म्हणून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६४ टक्के मतदानाची नोंद झाली होती. अंतिम आकडेवारी गेल्यावर्षीच्यात तुलनेत दोन ते तीन टक्के वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान, ७० टक्क्यांचा आकडा मतदान पार करण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : नगरपंचायत निवडणूक: सिंधुदुर्गात राणे-केसरकरांची प्रतिष्ठा पणाला
कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणूक मतदानाची वेळ आता संपल्यानंतर आता राजकीय नेत्यांचे निकालाकडे लक्ष लागलेय. केडीएमसीत सुमारे ४८ टक्के मतदान झालंय. तर प्रभाग क्रमांक ४६, १०५ आणि ११३ ची निवडणूक बिनविरोध झालीय. तर प्रभाग क्रमांक ११४ आणि ११९ मध्ये एकही अर्ज दाखल झाललेा नाही. त्यामुळे प्रत्यक्षात ११७ जागांसाठी साडेसातशे उमेदवारांचं भवितव्य मतदारांकडून मतदान यंत्रात बंद झालाय.
कोल्हापूर महापालिकेच्या ८१ जागांसाठी ५०६उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी तांडब्या पांढऱ्याचा आस्वाद घेताना मतदानाचा हक्कही तितक्याच उत्साहात बजावलाय.
दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असताना शिवसेनेला मात्र आपलं वर्चस्व कायम राहील असा विश्वास आहे. ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे याच्या मते पुन्हा केडीएमसीवर भगवा कायम राहिल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.