महिलेचा खून करून बाळाचे अपहरण, टोळी गजाआड

हडपसरमध्ये एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. एका महिलेचा खून करून तिच्या बाळाचे अपहरण करण्यात आलं. 4 अपहरणकर्त्यांना अटक करुन या बाळाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. निकीता कांगणे, पिंकी जाधव, चंद्रभागा उड्डानशिव, अक्षय उड्डानशिव अशी अपहरणकर्त्यांची नावं असून माया मोरे ही फरार आहे. 

Updated: Jun 19, 2016, 09:29 PM IST
महिलेचा खून करून बाळाचे अपहरण, टोळी गजाआड title=

पुणे : हडपसरमध्ये एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. एका महिलेचा खून करून तिच्या बाळाचे अपहरण करण्यात आलं. 4 अपहरणकर्त्यांना अटक करुन या बाळाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. निकीता कांगणे, पिंकी जाधव, चंद्रभागा उड्डानशिव, अक्षय उड्डानशिव अशी अपहरणकर्त्यांची नावं असून माया मोरे ही फरार आहे. 

चिमुकल्याचं अपहरण करणारी ही एक टोळी आहे. आरोपींनी पुण्यातल्या निरागस अशा 26 दिवसांच्या बालकाचं अपहरण केलं होतं. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी या बाळाच्या आईचा म्हणजेच मधू ठाकूचा निर्घृण खून केला. तीन दिवस मधू आणि तिच्या बाळाचा शोध लागत नसल्यानं हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. शनिवारी रात्री मधु ठाकूरचा मूर्तदेह हडपसर येथील रामटेकडी या ठिकाणी सापडला. अखेर पोलिसांनी खून आणि अपहरण करणा-या या चौघांना अटक केली असून एक महिला आरोपी फरार आहे.

अपहरण करणारी आरोपी महिला मृत मधू ठाकूरच्या आधीपासून संपर्कात होते. सहा महिन्यांआधी आरोपी महिलांनी गरोदर मधूशी संपर्क साधून मोफत उपचाराचे आमिष दाखवले होते. प्रसूतीसाठी पैसे आणि बाळाचे लसीकरण मोफत करण्याचं आमिष त्यांनी दाखवलं होतं. याच लसीकरणाच्या बहाण्याने आरोपींनी मधू ठाकूर आणि तिच्या मुलाला घेऊन गेले.

लहान मुलाचं अपहरण करुन त्यांची चार लाखात विक्री करण्याचा डाव हडपसर पोलिसांनी उधळलाय. मृत मधू ठाकूरच्या विक्रीचाही त्यांनी घाट घातला होता.. मात्र या नराधमांनी तिची हत्या केलीय.. आता या टोळीनं आणखी किती मुलं पळवून त्यांची विक्री केलीय याचा तपास हडपसर पोलीस करतायत.