नागपूर मनपाच्या विरोधी पक्ष पदाचा तिढा अखेर सुटला

महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष पदाचा तिढा अखेर सुटला आहे. प्रभाग क्रमांक ३० चे नगरसेवक संजय महाकाळकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Updated: Mar 5, 2017, 07:12 AM IST
नागपूर मनपाच्या विरोधी पक्ष पदाचा तिढा अखेर सुटला title=

नागपूर : महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष पदाचा तिढा अखेर सुटला आहे. प्रभाग क्रमांक ३० चे नगरसेवक संजय महाकाळकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी खासदार विलास मुत्तेमवार आणि शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गटातील नगरसेवक अशी ओळख असलेल्या महाकाळकर हे तिस-यांदा नगरसेवक म्हणून निवडूण आलेत. त्यांच्या या नेमणुकीने नागपूरातील चतुर्वेदी-राऊत गटाला मोठा धक्का असून पुन्हा एकदा या गटावर कुरघोडी करण्यात मुत्तेमवार गटाला यश आलं आहे. दरम्यान निवडणूक झाल्यावर एकाच आठवड्यात नगरसेवक पदाचा राजीनामा देणा-या गार्गी चोपडा यांनी तो मागे घ्यावा यासाठी काँग्रेस नेते त्यांची मनधरणी करत आहेत.