नंदुरबार-सुरत रेल्वेचे पाच डब्बे रुळावरून घसरले

नंदुरबारमध्ये सुरु असलेल्या पावसाच्या कहरामुळे याभागात असलेला रेल्वे मार्गही वाहून गेल्याने नंदुरबार-सुरत रेल्वेचे पाच डब्बे रुळावरून घसरले.

Updated: Jul 11, 2016, 02:17 PM IST
नंदुरबार-सुरत रेल्वेचे पाच डब्बे रुळावरून घसरले title=

नंदुरबार : नंदुरबारमध्ये सुरु असलेल्या पावसाच्या कहरामुळे याभागात असलेला रेल्वे मार्गही वाहून गेल्याने नंदुरबार-सुरत रेल्वेचे पाच डब्बे रुळावरून घसरले.

या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. रेल्वे अपघातामुळे भुसावळ- सुरत या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ण पणे विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रवाश्यांना प्रचंड हाल अपेष्टाना सामोरी जावं लागत आहे. 

अनेक गाड्या नवापूर आणि जळगाव येथून परत पाठविण्यात आल्यात. मात्र पाऊस सारखा सुरू असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. 

अपघातामुळे या मार्गावरील अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. नवजीवन एक्स्प्रेस,ताप्तीगंगा एक्स्प्रेस या गाड्या भुसावळ,खंडवा,भोपाळ, रतलाम मार्गे वळविण्यात आल्या आहेत.