वेंगुर्ल्यात नारायण राणेंचं पोस्टर फाडलं

वेंगुर्ला शहरात उद्योग मंत्री नारायण राणे यांचे 5 ते 6 डिजिटल बोर्ड अज्ञात इसमाने फाडलल्याचा प्रकार उघड झाला.

Updated: Jul 20, 2014, 10:27 AM IST
वेंगुर्ल्यात नारायण राणेंचं पोस्टर फाडलं title=

सिंधुदुर्ग : वेंगुर्ला शहरात उद्योग मंत्री नारायण राणे यांचे 5 ते 6 डिजिटल बोर्ड अज्ञात इसमाने फाडलल्याचा प्रकार उघड झाला.

हे बॅनर फाडल्याची घटना समजताच परिसरात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल झाले. 

वेंगुर्ल्यातलं वातावरण तणावपूर्ण बनलं असून शहरातला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 

काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष मनिष दळवी यांनी याबाबत वेंगुर्ला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. 

दरम्यान, आज नारायण राणे यांची कणकवली येथे सभा होत आहे, या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेनं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.