'इथं मोदी लाट नाही, इथं राणेच लागेल'

नाराज काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आज सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषद घेतली. आपल्यावर टीका करणाऱ्यांचा जोरदार समाचार यावेळी नारायण राणेंनी घेतलाय. 

Updated: Jul 19, 2014, 11:54 PM IST
'इथं मोदी लाट नाही, इथं राणेच लागेल' title=

सावंतवाडी : ‘काँग्रेसने सीएमपदाचा शब्द पाळला नाही. काँग्रेसमध्ये माझा गेम झाला’ अशा शब्दात राणेंनी आज सावंतवाडीमध्ये काँग्रेसवर ‘प्रहार’ केलाय. 'कोकणात दहशत असल्याचा खोटा प्रचार’ होत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केलाय

काय काय म्हटलंय यावेळी नारायण राणेंनी...

> माझ्यावरची टीका बंद करावी
> माझ्याविरोधात बोलाल तर पुन्हा वस्त्रहरण करीन
> 'केसरकर फक्त राजकारणच करतात'
> 'ज्यांना जिथे वाटतं तिथे जावं'
> 'मी पुण्य काम करतो त्यामुळे मला मन:शांती लाभते'
> काँग्रेसनं माझा गेम केला
> छोट्या पदाचा नारायण राणे भुकेला नाही
> मी अशी अनेक छोटी पदं स्वत:हून नाकारलीत
> 'नारायण राणेचा कुणी अपमान करणं आणि मी सहन करणं शक्य नाही'
> सहा महिन्यात मुख्यमंत्री पद देणार असं आश्वासन दिलं होतं
> काँग्रेसनं त्यांचं आश्वासन पाळलं नाही
> जुलै महिन्याचा मुहूर्त पाहत होतो
> केसरकर कर्तव्यशून्य - राणे
> माझ्यामुळेच मिळालं होतं केसरकरांना तिकीट
> जोपर्यंत पक्षात आहे, तोपर्यंत श्रेष्ठींनी बोलावल्यास जाणार
> सोमवारी माझी रणनीती स्पष्ट करेन
> माझी ताकद दिवसेंदिवस वाढतेय, माझ्यावर काहीही फरक नाही
> मी राज्याचा मुख्यमंत्री राहिलोय, मला कुणीही शिकवू नये
> हे बंड नाही तर भावना व्यक्त करण्याचा प्रकार
> कोकणात मोदींची लाट नाही
> इथे मोदी येणार नाही, इथं राणेच लागणार
> मी कुणाच्याही संपर्कात नाही

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.