नाशिक : नाशिकच्या या शेळ्या-मेंढ्या विमानाने थेट दुबईला निघाल्यायत. भारतीय शेळ्या-मेंढ्यांना अरब राष्ट्रात चांगली मागणी आहे...त्याची किंमतही चांगली मिळते. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार मेंढ्यांचं स्क्रीनिंग करून १२०० मेंढ्या दुबईला पाठवण्यात आल्या. याआधी समुद्र मार्गे भारतीय शेळ्या एक्स्पोर्ट होत असंत.
मात्र आता हवाई मार्गाने प्राणी निर्यात करण्याची सेवा पुरवण्यात आलीय. यातून प्रत्येक शेतक-याला दीडशे ते दोनशे रूपये किलोनं भाव मिळणारेय.
नाशिक जिल्ह्यातला शेतकरी तसा उद्योगी, द्राक्षासारख्या नाजूक फळबागेला तो लहान मुलांप्रमाणे जपतो. त्यामुळे नाशिकची द्राक्ष जगभरात भाव खाऊन जातात. आता शेळ्या-मेंढ्यांचा प्रयोगही यशस्वी होताना दिसतोय.
शासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावानं शेळ्यांच्या कार्गो सेवेला अडसर आला होता. मात्र आता थेट न्यायालयीन लढाई लढत नाशिकच्या शेतीपूरक व्यवसायाला नवी भरारी मिळणार आहे.