आयुक्त मुंढेंविरोधात आज नवी मुंबई पालिकेत अविश्वास प्रस्ताव

नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात आज महापालिकेत अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची मुंढेंविरोधात भूमिका स्पष्ट असल्याने हा ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 25, 2016, 01:44 PM IST
आयुक्त मुंढेंविरोधात आज नवी मुंबई पालिकेत अविश्वास प्रस्ताव title=

नवी मुंबई : नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात आज महापालिकेत अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची मुंढेंविरोधात भूमिका स्पष्ट असल्याने हा ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे.

आयुक्त मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपापल्या नगरसेवकांसाठी पक्षादेश जारी केलाय. मुंढेविरोधात ठराव मंजूर झाला तरी तो फेटाळण्याचा राज्य सरकारला पूर्ण अधिकार आहे. 

कायद्यातील तरतुदीनुसार मुंढेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभय देतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान, नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सर्व पक्षीय अविश्वास ठराव आणला आहे.

या विरोधात नवी मुंबई मधील मनसे मात्र पालिका आयुक्त यांच्या पाठीशी असून, सत्ताधाऱ्यांचा  भ्रष्टाचार मुंढे यांनी बाहेर काढला असल्याने मनसेने मुंढे यांना पाठिंबा दिला असून, तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.