'शिवसेनेला बाळासाहेबांच्या स्मारकाची वीटही रचता आली नाही'

इच्छाशक्ती असली तर काहीही करता येते. मात्र केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असताना देखील शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची वीटही रचता आली नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांवर तोफ डागली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 10, 2017, 10:29 PM IST
'शिवसेनेला बाळासाहेबांच्या स्मारकाची वीटही रचता आली नाही' title=

जालना : इच्छाशक्ती असली तर काहीही करता येते. मात्र केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असताना देखील शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची वीटही रचता आली नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांवर तोफ डागली.

अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या जिल्हा परीषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ जालन्यातील तीर्थपुरी येथे जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली.

पाहा हा व्हिडिओ :