नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे: पुण्यात बंडगार्डन पोलीस स्टेशनमधून खुनाच्या गुन्ह्यातला आरोपी पळाल्यामुळे काहीकाळ खळबळ माजली होती. पण दोन तासांत पोलिसांनी त्य़ाच्या मुसक्या आवळल्या.
बंडगार्डन पोलीस स्टेशनमधल्या लॉकअपमध्ये असलेला आरोपी नरेश म्हस्के याला सकाळी सातच्या सुमासास पोलिसांनी बाथरूमसाठी बाहेर काढलं. बाहेर आलेल्या म्हस्केनं बाथरूममध्ये जाण्याऐवजी थेट पोलीस स्टेशनबाहेर पळ काढला. खुनाच्या गुन्ह्यातला आरोपी पळाल्याने पोलिसांचीच पाचावर धारण बसली. तातडीने कामाला लागलेल्या पोलिसांनी दोन तासांत म्हस्केला पुन्हा पकडलं.
ताडीवाला रस्ता भागात दोन महिन्यांपूर्वी म्हस्केनं खून केला होता. त्यानंतर त्याला पकडायला पोलिसांना दोन महिने लागले होते. मात्र तो पळाल्यानं पोलिसात चांगलीच खळबळ माजली होती. अखेर येरवडा भागात असलेल्या नातेवाईकांकडे म्हस्के जाईल असा पोलिसांना अंदाज होता. त्यानुसार रचलेल्या सापळ्यात त्याच्या मुसक्या आवळल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.