...तर मग शरद पवारांनी कोणाला मतदान केलं ?

मग शरद पवारांनी नेमकं कोणाला मतदान केलं

Updated: Feb 21, 2017, 10:50 AM IST
...तर मग शरद पवारांनी कोणाला मतदान केलं ? title=

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. सुप्रिया सुळेंची मुलगी आणि शरद पवारांची नात रेवती सुळे हिने देखील आजोबांसोबत पहिल्यांदा मतदान केलं. शरद पवारांनी जेथे मतदान केलं त्या प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवार नाही. त्यामुळे मग शरद पवारांनी नेमकं कोणाला मतदान केलं असेल असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज प्रभाग क्रमांक 214 मध्ये मतदान केलं. पण पवारांच्या या प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही. राजकारणात शरद पवारांच्या वक्तव्याचा आणि त्यांची रणनितीचा कोणालाच अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे शरद पवारांनी नेमकं कोणाला मतदान केलं असेल हा प्रश्न अनेकांना पडला असला तरी याचा अंदाजही बांधन कठीणच आहे. या प्रभागात मुख्य पक्षाचे उमेदवार आहेत पण राष्ट्रवादीचा उमेदवार नाही.

पाहा कोण-कोण आहेत उमेदवार