नाशकात प्रचंड गोंधळ, मतदार यादीत नाव नसल्याने नागरिक संतप्त

 म्हसरुळ गावात मतदार यादीत नाव नसल्याने शेकडो मतदारांचा जमाव जमल्याने गोंधळ उडळाला आहे. याठिकाणी तणाव आहे. 

Updated: Feb 21, 2017, 12:25 PM IST
नाशकात प्रचंड गोंधळ, मतदार यादीत नाव नसल्याने नागरिक संतप्त title=

नाशिक : या ठिकाणी मतदार यादीत प्रचंड गोंधळ उडाला आहे. इथल्या म्हसरुळ गावात मतदार यादीत नाव नसल्याने शेकडो मतदारांचा जमाव जमल्याने गोंधळ उडळाला आहे. याठिकाणी तणाव आहे. मतदान यादीत नाव नसल्याने हा गोंधळ उडाला आहे.

नाशिकमध्ये एका मतदान केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे मतदान बंद पडले असून अधिकाऱ्यांना तात्काळ बोलविण्यात आले. तर अंबड भागात बोगस मतदान करण्यासाठी जात असताना काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मिनी ट्रकमधून नागरिक मतदानाला चालले होते.

अंबड भागाच्या जनता विद्यालयातील प्रकार उघड झालाय. तर नाशिक शहरामधील एका मतदान केंद्रावरील बिघाड दुरूस्त झाल्यानंतर अखेर अर्धा तासांच्या प्रयत्नांनंतर मतदान सुरळीत सुरु झाले.