नोटबंदीचा ताडोबा व्याघ्र पर्यटनावर परिणाम

देशात चलनबदल झाल्यानंतर त्याचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पावर पर्यटनाच्या दृष्टीनं परिणाम दिसून येत आहे. ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांची संख्या घटली नसली, तरी वेळेवरच्या सफारी चांगल्याच प्रभावीत झाल्या आहेत. 

Updated: Nov 22, 2016, 10:49 PM IST
नोटबंदीचा ताडोबा व्याघ्र पर्यटनावर परिणाम title=

चंद्रपूर : देशात चलनबदल झाल्यानंतर त्याचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पावर पर्यटनाच्या दृष्टीनं परिणाम दिसून येत आहे. ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांची संख्या घटली नसली, तरी वेळेवरच्या सफारी चांगल्याच प्रभावीत झाल्या आहेत. 

ताडोबाचं प्रवेशद्वार असलेल्या मोहर्ली गावाच्या अर्थकारणावरही याचा परिणाम दिसून आलाय. जुन्या नोटा स्वीकारणं बंद केल्यानं त्यांचा व्यवसाय कमी झालाय. हीच परिस्थिती राज्याच्या पर्यटन विभागाच्या रिसोर्टची आहे. इथं सुमारे १५ टक्के पर्यटक कमी झाले आहेत.