पत्रकार परिषदेतच पुणे पोलिसांची ओवैसींना कलम 144 ची नोटीस

गोळीबार मैदानावर परवानगी नाकारल्याने चर्तेत असलेली मुस्लीम आरक्षण परिषद अखेर कोंढव्यातील कौसरबाग मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी, पत्रकार परिषद सुरु असतानाच एमआयएमचे वादग्रस्त खासदार असउद्दीन ओवैसी यांना पुणे पोलिसांकडून कलम 144 ची नोटीस बजावण्यात आली. 

Updated: Feb 4, 2015, 02:34 PM IST
पत्रकार परिषदेतच पुणे पोलिसांची ओवैसींना कलम 144 ची नोटीस title=

पुणे : गोळीबार मैदानावर परवानगी नाकारल्याने चर्तेत असलेली मुस्लीम आरक्षण परिषद अखेर कोंढव्यातील कौसरबाग मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी, पत्रकार परिषद सुरु असतानाच एमआयएमचे वादग्रस्त खासदार असउद्दीन ओवैसी यांना पुणे पोलिसांकडून कलम 144 ची नोटीस बजावण्यात आली. 

ओवैसी यांनी पुण्यात जाहीर कार्यक्रमात भाषण मनाई करण्यात आलीय. कलम 144 नुसार त्यांच्यावर कारवाई करत त्यांना नोटीस बजावण्यात आलीय. यानुसार, पोलीस परवानगीशिवाय जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांना भाषण करता येणार नाही. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून याबद्दल पोलिसांनी आदेश जारी केलाय. ही नोटीस त्यांना पत्रकार परिषद सुरू असतानाच देण्यात आली. 

ओवेसींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर लोकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास न ठेवता कायदा-सुव्यवस्था राखावी, असं आवाहन यावेळी पुणे पोलीस आयुक्तांनी केलंय. 

'सद्यस्थिती सुदृढ लोकशाहीसाठी पोषक नाही... मुस्लिम शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास, उच्च न्यायालयानेही हे मान्य केलं आहे' असं ओवैसी यांनी म्हटलंय. यावेळी, आपला मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण मुस्लिमांनाही आरक्षण मिळण्याची मागणी त्यांनी केलीय.  

विरोधकांना विरोध करणं, माझं मत व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे... मी बोलतच राहणार... विरोधक माझ्याविरोधात बोलले की मला प्रसिद्धी मिळते, असंही ओवैसी यांनी यावेळी म्हटलंय. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न बोलता परत जाईन पण कायदा मोडणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्रात आगामी अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकासाठी 3000 कोटींची तरतूद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलंय.   

याअगोदर, ओवैसी यांचा इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. सभेत त्यांनी सामाजिक तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य केलं तर पोलिसांनी तात्काळ सभा बंद करावी आणि कारवाई करावी असे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना दिल्याचं पुणे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.