जिल्हा बँकांवरचा धोका तुर्तास तरी टळला

राज्यातील अडचणीत असलेल्या दहा जिल्हा बँकांनी वर्षअखेरीस CRR राखण्यात यश मिळवलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 19, 2017, 08:47 AM IST
  जिल्हा बँकांवरचा धोका तुर्तास तरी टळला title=

नाशिक : राज्यातील अडचणीत असलेल्या दहा जिल्हा बँकांनी वर्षअखेरीस CRR राखण्यात यश मिळवलंय. यात कोल्हापूर बँकेची स्थिती उत्तम झालीय. आता फक्त दोन बँका अडचणीत असल्याचं सांगत सहकार मंत्र्यांनी बँकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता फेटाळली आहे. 

गेल्या वर्षापासून भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवहार चालू ठेवण्यासाठी जिल्हा बँकांना CRR म्हणून ९ टक्क्यांचा दर राखीव ठेवणं आवश्यक केलं होतं. 

गेल्यावर्षी नागपूर, बुलडाणा, वर्धा या तीन जिल्ह्यात परवाने रद्द होण्याची नामुष्की आली होती. मात्र ही कारवाई टाळण्यासाठी या तीन जिल्हा बँकात सरकारने ५२५ कोटी रूपये टाकले होते. मात्र यावर्षी आणखी आठ बँका अडचणीत येण्याची भीती होती. मात्र आता केवळ दोनच बँका अडचणीत आहेत.