महाड पूल दुर्घटना : आणखी एक मृतदेह सापडला

केंबुर्लीतील नीलकमल हॉटेलजवळ हा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही.

Updated: Aug 7, 2016, 09:17 AM IST
महाड पूल दुर्घटना : आणखी एक मृतदेह सापडला title=

महाड : केंबुर्लीतील नीलकमल हॉटेलजवळ हा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही.

महाड दूर्घटनेतील बेपत्ता प्रावाशांपैकी आतापर्यंत २५ जणांचे मृतदेह सापडले आहेत. अनेक बेपत्ता नागरिकांचे नातेवाईक महाडमध्ये गर्दी करत आहेत. महाड इथल्या ग्रामीण रूग्णालयात 4 डॉक्टरांचं पथक तयार आहे. तीसहून अधिक मृतदेह ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. खाडीकिनारी ठिकठिकाणी रूग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत.