पाकिस्तानवर चार वेळा हल्ला केला, आम्ही गवगवा केला नाही : पवार

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही पाकिस्तानवर चार वेळा हल्ले करण्यात आले. मात्र आम्ही कधीही त्याचा गवगवा केला नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. 

Updated: Oct 6, 2016, 04:57 PM IST
पाकिस्तानवर चार वेळा हल्ला केला, आम्ही गवगवा केला नाही : पवार title=

नागपूर : पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही पाकिस्तानवर चार वेळा हल्ले करण्यात आले. मात्र आम्ही कधीही त्याचा गवगवा केला नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. 

भारताने पीओकेत जाऊन सर्जिकल हल्ला केला याबद्दल सरकारचं कौतुकच करायला हवं. मात्र अशा हल्ल्यांची जाहीर वाच्यता करणे चुकीचे असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

अॅट्रॉसिटीचे जतन व्हावे. गैरवापरसंबंधी भूमिका घेतली पाहिजे. मराठा आरक्षणाबाबत मूळ प्रश्नांची सोडवणूक करण्याची भूमिका नाही. विस्थापितांच्या दुखण्यातून आरक्षणाची मागणी

सर्जिकल स्ट्राईकवरुन देशासमोर राजकारण महत्वाचे नाही. अवघ्या देशाने अशा वेळी एक व्हायला हवे, आम्ही यात राजकारण आणणार नाही, मात्र, प्रसिद्धीसाठी असं व्हायला नको, असे शरद पवार म्हणालेत.