मानवी कवट्या, तलवारींसह सहा भोंदूबाबांना अटक

पालघर जिल्हातील विक्रमगड तालुक्यातील साखरे येथील जंगलात भोंदू बाबांचा अघोरी कृत्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. बनावट नोटा, मानवी कवड्या, तलवारी, घटनास्थळी सापडल्या आहेत.

Updated: Aug 5, 2015, 09:33 PM IST
मानवी कवट्या, तलवारींसह सहा भोंदूबाबांना अटक  title=

पालघर : पालघर जिल्हातील विक्रमगड तालुक्यातील साखरे येथील जंगलात भोंदू बाबांचा अघोरी कृत्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. बनावट नोटा, मानवी कवड्या, तलवारी, घटनास्थळी सापडल्या आहेत.

साखरे येथील जंगलात जवळपास तीस ते पस्तीस भोंदूबाबाच अघोरी कृत्य सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या टाकलेल्या धाडीत सहा भोंदू बाबा अटकेत आलेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. 

बनावट नोटा, मानवी कवड्या, तलवारी, घटनास्थळी सापडल्या आहेत. दरम्यान घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.