औरंगाबाद : गुजरात आणि मध्यप्रदेशातील पावसाचा प्रवास विदर्भ, मराठवाड्याच्या दिशेने सुरू झालाय. अशावेळी राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, यावर कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत.
कावळा बसण्याचा आणि फांदी मोडण्याची एकच वेळ झाल्याने, नैसर्गिकरित्या आलेला पाऊस, कृत्रिम पद्धतीने पाडल्याचं भासवलं जात आहे.
मराठवाड्यात जवळ-जवळ सर्वदूर पावसाला सुरूवात झाली आहे, अशावेळी पावसाचं सिझर केल्याचं दाखवलं जातंय, पण हे सिझर नसून, ही पावसाची नॅचरल डिलेव्हरी तर नाही ना, हे तपासून पाहिलं पाहिजे, कारण यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपये वाचणार आहेत.
मराठवाड्यात आणि विदर्भात पाऊस उशीरा दाखल झाला आहे, आणि तो आता पिकांना फारसा उपयोगी नाही, कारण पिकांची नैसर्गिक वाढ खुंटली आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे.
कृत्रिम पाऊस पाडण्याची प्रक्रिया ही १५ ते २० दिवसांआधी सुरू करण्याची गरज होती. तरच सर्वांनी म्हटलं असतं की, पावसाची नॅचरल डेलिव्हरी नाही, सिझर झालं, पण आता पावसाच्या सिझर आधीच, नॅचरल डिलेव्हरी झाल्याचं चित्र आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.