'ज्ञानोबा - तुकारामsss' उभ्या रिंगणात वारकरी रंगले...

फडफडणाऱ्या भगव्या पताका... टाळमृदंगाचा गजर.. टिपेला पोचलेला माउलीनामाचा जयघोष... रिंगणाकडे उत्कंठापूर्ण खिळलेल्या उपस्थित लाखो भाविकांच्या नजरा.. अन्  विक्रमी गर्दीत माउलींच्या अश्वाने केलेली बेफाम घोडदौड... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात माउलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण खुडूसफाटा इंथं पार पडलं. सकाळपासून भाविकांनी रिंगण सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. माळशिरसच्या विसाव्यानंतर आता माऊलींच्या पालखीनं वेळापूरकडे प्रस्थान ठेवलं असून माऊलींचा मुक्काम वेळापुरात असणार आहे.

Updated: Jul 23, 2015, 04:13 PM IST
'ज्ञानोबा - तुकारामsss' उभ्या रिंगणात वारकरी रंगले...   title=
सौ. फेसबुक

पुणे : फडफडणाऱ्या भगव्या पताका... टाळमृदंगाचा गजर.. टिपेला पोचलेला माउलीनामाचा जयघोष... रिंगणाकडे उत्कंठापूर्ण खिळलेल्या उपस्थित लाखो भाविकांच्या नजरा.. अन्  विक्रमी गर्दीत माउलींच्या अश्वाने केलेली बेफाम घोडदौड... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात माउलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण खुडूसफाटा इंथं पार पडलं. सकाळपासून भाविकांनी रिंगण सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. माळशिरसच्या विसाव्यानंतर आता माऊलींच्या पालखीनं वेळापूरकडे प्रस्थान ठेवलं असून माऊलींचा मुक्काम वेळापुरात असणार आहे.

सराटीचा निरोप घेऊन जगतगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी बोरगावकडे मार्गस्थ झाली. दरम्यान, माळीनगरमध्ये तुकोबांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार पडलं. वारकऱ्यांचा चालण्याचा थकवा घालविण्यासाठी तसेच संतांची पूजा म्हणून वारीत रिंगण सोहळे होतात. उभ्या रिंगणात पहिल्या दिंडीपासून शेवटच्या दिंडीपर्यंत अश्वा धावत जातो. शेवटच्या दिंडीपासून परत फिरून पालखी रथापुढे येतो आणि पादुकांसमोर नतमस्तक होतो. 

या वेळी रस्त्याच्या दुतर्फा वारकरी टाळ- मृदंगांच्या गजरात ‘तुकारामऽ तुकारामऽऽ...‘ नामघोष करतात. रिंगण पूर्ण होतं आणि पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होतो... असा हा नेत्रदीपक रिंगण सोहळा माळीनगरमध्ये पार पडला.. तुकोबांची पालखी बोरगावात विसावा घेणार असून यापुढे वाखरी, बाजीरावची विहीर आणि पंढरपूर नाक्यायजवळ उभं रिंगण होईल.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.