कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावरील हल्ला प्रकरणी हल्लेखोरांचे स्केच तयार करण्यात आले आहे. उमा पानसरे यांच्या माहितीवरून हे स्केच तयार करण्यात आले.
उमा पानसरे यांचा हल्ल्यानंतर जबाब घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, हल्लेखोर काळ्या गाडीवरून आले होते. हल्लेखोरांनी हल्ल्यापूर्वी उमा पानसरे यांनाच पत्ता विचारला होता.
हल्ल्यावेळी घटनास्थळी १-२ जण उपस्थित होते. हल्ला करणारे दोघे होते असेही उमा पानसरे यांनी सांगितले. हल्ल्यापूर्वी हल्लेखोरांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली.
या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
पानसरे हल्ल्यातील काही महत्त्वाचे मुद्दे
1) हल्लेखोरांचे स्केच तयार
2) हल्लेखोर काळ्या गाडीने आले होते
3) हल्ल्याच्या पूर्वी उमा पानसरे याना हल्लेखोरांनी पत्ता विचारला होता.
4) हल्ल्यावेळी 1-2 जण घटनास्थळी होते
5) हल्लेखोर दोघे होते
6) हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोरांनी परिसराची रेकी केली.
7) 1 युवक पोलिसांच्या ताब्यात
8) अजून ठोस काही हाती नाही लागले.
9) उमा पानसरे यांचा जबाबातील माहिती अपूर्ण
10) थोडीच माहिती मिळाली आहे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.