गल्लीतल्या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या

गल्लीतील टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून सिन्नरमधील नवनीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. 

Updated: Aug 30, 2016, 09:48 PM IST
गल्लीतल्या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या title=

नाशिक : गल्लीतील टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून सिन्नरमधील नवनीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. 

पायल सोळंकी असं या मुलीचं नाव असून नागेश गोसावी आणि रोहित पाटील हे दोन तरूण तिला त्रास देत होते, अशी तिच्या कुटुंबीयांची तक्रार आहे.

या दोघांपासून पायलला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास होत होता. त्यानंतर त्यांना समजही देण्यात आली होती. मात्र तरीही त्याच काही उपयोग झाला नाही. टवाळखोरांचा त्रास सुरूच राहिला. 

अखेर या जाचाला कंटाळून तिने आत्महत्येचा मार्ग पत्करलाय. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय. 

या घटनेने मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनीही या घटनेची दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात.