मालेगाव : मालेगाव चांदवड महामार्गावर पाटण फाटा येथे दोन ट्रकमध्ये विचित्र अपघात झाला, पण या अपघातनंतर येथील गावकऱ्यांच्या माणुसकीचं दर्शन पाहायला मिळलं.
काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास मालेगावहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रक पैकी ख़डी घेऊन जाणारी ट्रक स्पीड ब्रेकर जवळ थांबली. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला समोरची थांबलेली ट्रक दिसली नाही. त्यामुळे खडीच्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे खडीची ट्रक २० फूट पुढे फेकली गेली आणि डिव्हाडरवर चढली आणि या धडकेत मागील ट्रकचा ड्रायव्हर ट्रकमध्येच अडकून पडला. या वेळी त्याला काढणे खूप अवघड जात होते. शेजारच्या गावातील नागरिकांनी त्वरित जेसीबी आणि अब्युलन्स बोलावली आणि त्याला वैदकीय मदत देण्याचा प्रयत्न केला.
पण ट्कच्या केबिनमध्ये अडकलेल्या ड्रायव्हरला काढणे शक्य नव्हते. जेसीबी आले आणि त्या ड्रायव्हरला सांगाड्यातून काढले. ड्रायव्हरला काढल्यावर सर्वांनी टाळ्या वाजून माणुसकी दाखविणाऱ्या नागरिकांचे अभिनंदन केले.