सावधान! बँक खात्याची, एटीएमची माहिती विचारणाऱ्या कॉल्सना बळी पडू नका

फोनवर निनावी कॉल येऊन आपल्या बँक खात्याची माहिती विचारत असेल तर त्याला माहिती देऊ नका. हे आवाहन वारंवार बँकेकडून केलं जातं.. झी २४ तासनंही काही दिवसांपूर्वी असं एक प्रकरण दाखवलं होतं. तरीही अजून काही जण धडा शिकलेले नाहीत. अशा फोनकॉल्सना बळी पडलेत चक्क एक सीआयडी ऑफिसर, एक बँक मॅनेजर आणि काही टेक्नोसॅव्ही हे बिरूद मिरवणारे आयटी कर्मचारी... 

Updated: Jun 9, 2015, 09:29 PM IST
सावधान! बँक खात्याची, एटीएमची माहिती विचारणाऱ्या कॉल्सना बळी पडू नका title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : फोनवर निनावी कॉल येऊन आपल्या बँक खात्याची माहिती विचारत असेल तर त्याला माहिती देऊ नका. हे आवाहन वारंवार बँकेकडून केलं जातं.. झी २४ तासनंही काही दिवसांपूर्वी असं एक प्रकरण दाखवलं होतं. तरीही अजून काही जण धडा शिकलेले नाहीत. अशा फोनकॉल्सना बळी पडलेत चक्क एक सीआयडी ऑफिसर, एक बँक मॅनेजर आणि काही टेक्नोसॅव्ही हे बिरूद मिरवणारे आयटी कर्मचारी... 

गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिकांना मी तुमच्या बँकेतून बोलतोय. तुमच्या खात्यातील पैसे आयकर खातं काढून घेईल अशी भिती दाखवली जात आहे. त्यातून त्यांचे खाते क्रमांक, एटीएम कार्डनंबर घेऊन त्यांना लुबाडल्याच्या घटना उघड होत आहेत. मात्र आता सर्वसामान्यांसोबत अशा कॉल्सवर विश्वास ठेऊन फसलेल्यांमध्ये मोठ्या पदावरचे अधिकारीही आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या एका सीआयडी ऑफिसरला, एका बँक मॅनेजरला आणि काही आयटी कर्मचाऱ्यांना अशा भामट्यांनी फसवत अक्षरशः लुबाडलंय. अर्थात ही मंडळी खूपच मोठ्या पदावरची असल्यामुळं त्यांनी बोलायला नकार दिलाय. पण अशा पद्धतीनं फसलेल्या एका वृद्धानं मात्र त्याच्याबाबत घडलेली हकीकत कॅमेऱ्यासमोर सांगितली.

फोन करणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला इतकी भीती घालते की फोन ऐकणारा त्यांच्या जाळ्यात अडकतोच. पण अशा भितीला जर पोलीस अधिकारी, बँक मॅनेजर, सो कॉल्ड टेक्नोसॅव्ही आयटी कर्मचारी बळी पडू लागले तर काय म्हणावं. असे कोणतेही कॉल्स बँकेतून केले जात नाही हे बँकांकडून वारंवार स्पष्ट केलं जातंय. 

असे फोन करून नागरिकांच्या खात्यातले पैसे काढून घेण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे तुम्ही सावधान रहा.. फोन करून कोणी तुमच्या खातेक्रमांक, एटीएम क्रमांक, पीन नंबर असं काहीही विचारलं तर अजिबात माहिती देऊ नका... ही माहिती दिलीत तर तुमच्या खात्यात काहीच शिल्लक राहणार नाही हे नक्की लक्षात ठेवा..

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.