पिंपरी चिंचवडमध्ये युतीची बोलणी फिस्कटल्यात जमा

पिंपरी चिंचवडमध्ये युतीची बोलणी जवळपास फिस्कटल्यात जमा आहेत. शिवसेना आणि भाजपने दिलेले प्रस्ताव दोन्ही पक्षांना मान्य नाहीत.. एकंदरीतच मुंबई मध्ये युती झाली तरच पिंपरी चिंचवड मध्येही युती होण्याची शक्यता आहे

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 23, 2017, 11:09 PM IST
पिंपरी चिंचवडमध्ये युतीची बोलणी फिस्कटल्यात जमा title=

 कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये युतीची बोलणी जवळपास फिस्कटल्यात जमा आहेत. शिवसेना आणि भाजपने दिलेले प्रस्ताव दोन्ही पक्षांना मान्य नाहीत.. एकंदरीतच मुंबई मध्ये युती झाली तरच पिंपरी चिंचवड मध्येही युती होण्याची शक्यता आहे
 
पिंपरी चिंचवडमध्येही शिवसेना भाजपमध्ये युतीची बोलणी बंद आहेत..  ५० टक्के जागा मागणाऱ्या शिवसेनेनं १२८ पैकी ५४ जागा मागितल्या आहेत तर भाजपला ५८ जागा दिल्या आहेत.. घटक पक्षांनाही १५ जागा सोडण्याची तयारी सेनेनं दाखवली आहे. म्हणजेच १२८ पैकी भाजपला तब्बल ७३ जागा देण्याची तयारी सेनेनं दाखवलीय. पण त्याच वेळी हा आमचा अंतिम प्रस्ताव असल्याचं सेनेनं स्पष्ट केलंय...!

 

शिवसेना स्वत:ला कमी जागा मागेल याची कल्पना नसलेलं भाजप मात्र प्रस्तावानं पुरत गोंधळलंय. त्यामुळं वेळ काढण्याचा प्रयत्न भाजप कडून होताना दिसू लागलाय.

एकंदरीतच स्थानिक पातळीवर युती होणार की नाही हे मुंबईत युती होतेय की नाही यावर अवलंबून असल्याचं स्पष्ट होत आहे. तूर्तास या दोन्ही पक्षातली चर्चा थांबली आहे. आणि म्हणूनच युतीचं भवितव्य सध्या तरी लकटलेलं आहे.