पिंपरीत १४ लाखांचे वीज बिल, ग्राहकाला बसला 'शॉक'

पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या गाडे कुटुंबियांची सध्या झोप उडालीय. तुम्ही कितीही वीज वापरली तरी महिन्याचं घरगुती वापराचं बिल किती येईल. साधारणतः २ हजार रूपये. पण पिंपरी चिंचवडच्या गाडे कुटुंबियाना पाच महिन्याचं बिल आले आहे,

Updated: Dec 26, 2015, 06:25 PM IST
पिंपरीत १४ लाखांचे वीज बिल, ग्राहकाला बसला 'शॉक' title=

पिंपरी : पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या गाडे कुटुंबियांची सध्या झोप उडालीय. तुम्ही कितीही वीज वापरली तरी महिन्याचं घरगुती वापराचं बिल किती येईल. साधारणतः २ हजार रूपये. पण पिंपरी चिंचवडच्या गाडे कुटुंबियाना पाच महिन्याचं बिल आले आहे,

१४  लाख ४२ हजार रूपये. 

एवढं बिल पाठवणाऱ्या महावितरणने साधी नोटीसही न पाठवता गाडे यांच्या घराची वीजही कापली. त्यामुळे महिन्याभरापासून गाडे कुटुंबीय अंधारात आहेत. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी परिसरात राहणाऱ्या पांडुरंग गाडे यांना जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यासाठी हे बिल आले आहे.

गाडे यांना नेहमी साधारणतः ९०० रूपयांपर्यंत बिल येते. गाडे यांनी वारंवार विचारणा केली. पण त्यांना महावितरणकडून काहीही उत्तर देण्यात आलेले नाही. अखेर कोणतंही कारण न देता महावितरणकडून गाडे यांचा विजपुरवठा खंडीत केलाय.

दुसरीकडे काळेवाडी महावितरणचा एकही अधिकारी यावर बोलायला तयार नाही. दोन खोल्यांच्या ब्लॉकचे बिल १४ लाख रूपये कसे येऊ शकते ही साधी बाब या अधिकाऱ्यांना समजत नाही, हे चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.