औरंगाबाद : पोलिसांनी व्यापाऱ्याचे आठ लाख रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. इतकच नाही तर हा प्रकार अंगलट येताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पैसे परत देखील केले.
मात्र पोलीस आयुक्तांनी चौकशी करत त्या पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तडका फडकी बदली केली आहे.
वाळूज परिसरातील एका ढाब्यावर मंगळवारी शेती विक्रीचा व्यवसाय करणारा व्यापारी जुन्या नोटा असलेले आठ लाख दहा हजार रुपये बदलण्याचा व्यवहार करत होता. त्याची माहिती वाळूज पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला, व्यापाऱ्याला नोटांसह ठाण्यात आणले.
त्याच्याजवळील नोटा स्वत:कडे ठेवून घेत व्यापाऱ्याला हाकलून दिले, आणि या घटनेबाबत कुठही वाच्यता केली नाही. मात्र पोलिस काहीच बोलत नाहीत हे पाहून तो व्यापारी थेट पोलिस आयुक्तांकडे गेला आणि तक्रार केली.