पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चारही आरोपींना अटक करण्यात आलीय. 

Updated: Sep 8, 2016, 07:54 AM IST
पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या चौघांना अटक title=

कल्याण : कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चारही आरोपींना अटक करण्यात आलीय. 

हे सर्व आरोपी कल्याणमधल्याच जरीमरी मित्र मंडळचे कार्यकर्ते आहेत. यातला मुख्य आरोपी असलेल्या राहुल गायकवाडलाही गजाआड करण्यात आलंय. 

नयन,नरेश आणि बंदेश अशी इतर आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी पोलिसांच्या चार टीम्स बनवण्यात आल्या होत्या.  पोलीस रात्रीपासूनच आरोपींच्या मागावर होते. जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे असे आरोप या चौघांवर ठेवण्यात आले आहेत.