मुंबई : आता तुम्हाला एखादी तक्रार करणे सहज आणि सोपे झाले आहे. आवाज रेकॉर्ड करुन तक्रार नोंदविणे शक्य झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर आवाज रेकॉर्ड करून तक्रार नोंदवण्याच्या प्रणालीची सुरुवात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
प्रवासी आणि पर्यटकांचा प्रवास अधिक आरामदायक करण्याचा प्रयत्न म्हणून सुरेश प्रभू यांनी रविवार कोकण रेल्वे मार्गावर फोन करून तक्रार नोंदविण्याच्या प्रणालीचे उद्घाटन केले.
कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काही तक्रार असल्यास ती तक्रार २४ x ७ टोल-फ्री असणारा क्रमांक 18002665725 वर नोंदवता येईल. नंबर डायल केल्यानंतर, प्रवाशी त्याची तक्रार रेकॉर्ड करू शकतो. फोन केल्यावर एक ऑडिओ फाइल तयार होते आणि त्याची दखल कोकण रेल्वे अधिकाऱ्यांतर्फे घेतली जाते. तक्रार निवारण झाल्यावर त्याचे उत्तर एसएमएस द्वारे दिले जाऊ शकते.
कोकण रेल्वेने आधीच एक एसएमएस तक्रार क्रमांक 9004470700 सुरु केला आहे. ज्यावर प्रवासी विविध प्रवाशी-सेवेविषयी त्यांच्या तक्रारी एसएमएस करू शकतात. नवीन तक्रार नोंदणी क्रमांक 18002665725 वर ते त्यांच्या तक्रारी रेकॉर्ड करू शकतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.