पुणे : पुण्याच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रशांत जगताप हे वानवडीतील प्रभाग क्रमांक 61 (ब) मधून निवडून आले आहेत. येत्या 25 तारखेला महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे.
पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची आघाडी असल्याने जगताप यांची निवड निश्चित मानली जातेय. महापौरपदासाठी हडपसर की खडकवासला विभागाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता होती.
पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने महापौरपदाबाबत पक्षाच्यावतीने विशेष दक्षता घेण्यात आली आहे. त्यात जगताप यांना संधी मिळाली. जगताप यांनी "पीएमपीएल‘चे संचालक म्हणूनही काम केले आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादीतर्फे दीपक मानकर, विकास दांगट, बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, दिलीप बराटे हे नगरसेवक इच्छुक होते.