तीन कैद्यांनी तोडली नेवासा जेलची भिंत, पळून जायचा प्रयत्न फसला

पोलिसांच्या तावडीतून आणि तुरुंगातून कैदी पळून जाण्याचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाहीये.

Updated: Dec 25, 2016, 06:20 PM IST
तीन कैद्यांनी तोडली नेवासा जेलची भिंत, पळून जायचा प्रयत्न फसला title=

नेवासा : पोलिसांच्या तावडीतून आणि तुरुंगातून कैदी पळून जाण्याचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाहीये. नेवासा जेलमधील तीन कैदी भिंतीला भगदाड पाडून पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी तैनात असलेल्या गार्डला ही बाब लक्षात आल्यानं कैद्यांचा हा प्रयत्न फसलाय.

याआधी एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेले आरोपी पोलिसांना धक्का देऊन पळून गेल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली होती. औरंगाबादेतील एका गुन्ह्यात वर्ग करण्यात आलेल्या 4 आरोपींना नगर सबजेलकडे घेऊन जात असताना दोन आरोपी पोलिसांना धक्का देऊन पळाले होते. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत फरार आरोपींना अटक केलीय. राज्यात कैदी फरार होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.