मुंबई: राज्यात गारपीटीनं नुकसान झालेल्या गारपीटग्रस्तांना सरकारनं अखेर मदत झाहीर केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी या मदतीची घोषणा विधानसभेत केली असून यामध्ये नुकसानग्रस्तांना सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहेत.
सरकारनं जाहीर केलेल्या घोषणेनूसार फळबागासाठी हेक्टरी २५ हजार रूपये, गारपीटानं मृत पावलेल्या मोठया जनावरांसाठी २५ हजार रूपये, पक्क्या घरांचं नुकसान झालेल्यांसाठी ७० हजार रुपये, कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १० हजार रुपये तर गारपीटीनं मृत पावलेल्या शेळयांची भरपाई म्हणून ३,५०० रुपये देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचं तीन महिन्याचं वीजबील माफ करण्याची घोषणाही यावेळी खडसे यांनी केली.
गारपीटग्रस्तांना जाहीर झालेली मदत
पडझड झालेल्या घरांसाठी मदत
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.