रत्नागिरीत पुलोत्सवाला प्रारंभ, किर्ती शिलेदार यांना पुलोत्सव सन्मान

शहरात पुलोत्सवाला प्रारंभ झाला असून  गायक व अभिनेत्री किर्ती शिलेदार यांना पुलोत्सव सन्मान देऊन गौरविण्यात आले.

Updated: Dec 3, 2016, 03:55 PM IST
रत्नागिरीत पुलोत्सवाला प्रारंभ, किर्ती शिलेदार यांना पुलोत्सव सन्मान title=

रत्नागिरीत : शहरात पुलोत्सवाला प्रारंभ झाला असून  गायक व अभिनेत्री किर्ती शिलेदार यांना पुलोत्सव सन्मान देऊन गौरविण्यात आले.

 तीन दिवस चालणाऱ्या पुलोत्सवाला शुक्रवारपासून रत्नागिरीत प्रारंभ झाला. पु. ल. देशपांडे रत्नागिरीचे जावई असल्याने आणि त्यांच्या अजरामर कलाकृतीत रत्नागिरीचा उलेल्ख वारंवार आल्याने पु. ल. च्या या लाडक्या शहरात असलेल्या या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे.  

रत्नागिरीच्या आर्ट सर्कल आणि आशय सांस्कृतीक पुणे यांच्या तर्फे हा सन्मान दरवर्षी दिला जातो. ख्यातनाम साहित्यिक कै. पु.ल. देशपांडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा सन्मान देण्यात येतो. रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी किर्ती शिलेदार यांच्या भारदार गायनाने कार्यक्रमाला आणखीनच शोभा आणली.