रुग्णांना अमृतरस पाजणाऱ्या बाबानं घेतली डॉक्टरांकडे धाव!

टोमॅटो अ डे... किप्स डॉक्टर अवे..? काहीतरी गडबड झालीय का..? मुळीच नाही... कारण पुण्यामध्ये एक टोमॅटो बाबा आहे, तो म्हणे जगातल्या सर्व व्याधी केवळ टोमॅटो ज्यूसनं बऱ्या करतो. पण हा टोमॅटो बाबा स्वतःच अडचणीत सापडलाय.

Updated: Dec 8, 2014, 11:34 PM IST
रुग्णांना अमृतरस पाजणाऱ्या बाबानं घेतली डॉक्टरांकडे धाव! title=

पुणे: टोमॅटो अ डे... किप्स डॉक्टर अवे..? काहीतरी गडबड झालीय का..? मुळीच नाही... कारण पुण्यामध्ये एक टोमॅटो बाबा आहे, तो म्हणे जगातल्या सर्व व्याधी केवळ टोमॅटो ज्यूसनं बऱ्या करतो. पण हा टोमॅटो बाबा स्वतःच अडचणीत सापडलाय.

विविध व्याधींनी ग्रासलेले रूग्ण ज्या बाबाकडे अमृत रस घेण्यासाठी जायचे, तोच बाबा म्हणजे नितीन महाराज थोरात आपल्या स्वतःच्या बाळावर उपचार करण्यासाटी पुण्याला डॉक्टरांकडे आला होता.

आता हा नितीन महाराज थोरात कोण, असा प्रश्न तुम्हाला पडेल. पुणे जिल्ह्यातल्या पिंपळगावात फिरंगाईच्या डोंगरावर सर्वांना अमृत रस पाजणारा हाच तो टोमॅटो बाबा... हा अमृतरस म्हणजेच टोमॅटो ज्यूस प्राशन केल्यानं जगाच्या पाठीवरील सगळे आजार बरे होतात अशी लोकांची धारणा आहे. त्यामुळंच फिरंगाईच्या डोंगरावर बारमाही जत्रा भरायची.

या सगळ्या प्रकाराविरूद्ध आवाज उठू लागल्यानंतर टोमॅटो बाबांनी तूर्तास रसप्राशनाचा कार्यक्रम थांबवला आहे. साखर गाळपाचा हंगाम संपल्यानंतर टोमॅटो ज्यूसचे वाटप पुन्हा सुरू होईल, असं सांगण्यात येतंय. मात्र हा सगळा अंधश्रद्धेचा प्रकार असून, पीडितांची फसवणूक करणाऱ्या या नितीन महाराज थोरातवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलीय.

अंधश्रद्धा पसरवण्याचा तसंच बेकायदेशीर कमाई करण्याचा आरोप झाल्यानं हे महाराज व्यथित झालेत. विरोधकांनी आपल्यावरील आरोप सिद्ध करून दाखवावेत, असं आव्हानच त्यांनी दिलंय.

आता प्रश्न अगदी साधा आहे. टोमॅटो महाराज, तुमच्या अमृत रसामध्ये एवढी शक्ती आहे ना, मग स्वतःच्या बाळाला तो का पाजला नाही? आपल्या बाळावर उपचार करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे का यावं लागतं...? याचं उत्तर शोधण्यासाठी कुठल्याही यात्रेला किंवा देवळात जायची गरज नाही. प्रत्येकानं फक्त आपली सद्सद् विवेकबुद्धी वापरण्याची गरज आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.