विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे?

विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आज घोषित होण्याची शक्यता आहे.  कारण विधान परिषदेत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचं संख्याबळ अधिक आहे.

Updated: Dec 9, 2014, 08:37 AM IST
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे? title=

मुंबई: विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आज घोषित होण्याची शक्यता आहे.  कारण विधान परिषदेत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचं संख्याबळ अधिक आहे.

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
 
विधानपरिषदेत राष्ट्रवादीकडे सर्वाधिक सदस्य आहेत. त्यामुळे विरोधीपक्षनेतेपद त्यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित आहे. धनंजय मुंडेंची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याचे संकेत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.