पुणे स्फोट : पोलीस टार्गेट - गृहमंत्री, आक्षेपार्ह मजकूर

पुणे स्फोट हे पोलिसांसाठी आव्हान आहे. पोलिसांना टार्गेट केलं जात असून पोलीस त्याला सडेतोड उत्तर देतील, असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला. सांगली जिल्ह्यातील तुर्ची येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, चंद्रपूरच्या वरोरा शहरातील दोन इमारतींवर आक्षेपार्ह मजकूर आढळून आला.

Updated: Jul 12, 2014, 08:05 PM IST
पुणे  स्फोट : पोलीस टार्गेट - गृहमंत्री, आक्षेपार्ह मजकूर title=

सांगली/ चंद्रपूर : पुणे स्फोट हे पोलिसांसाठी आव्हान आहे. पोलिसांना टार्गेट केलं जात असून पोलीस त्याला सडेतोड उत्तर देतील, असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला. सांगली जिल्ह्यातील तुर्ची येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, चंद्रपूरच्या वरोरा शहरातील दोन इमारतींवर आक्षेपार्ह मजकूर आढळून आला.

पुण्यात अजून सीसीटीव्ही का बसवले गेले नाहीत, हा मुद्दा झी २४ तासनं लावून धरला होता. तसंच पुण्यातले सीसीटीव्ही टेंडर प्रक्रियेत अडकल्याचंही झी २४ तासनं समोर आणलं होतं. त्याची दखल घेत सीसीटीव्हीच्या टेंडर प्रक्रियेत ज्यांनी दिरंगाई केली, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. झी २४ तासनं हा मुद्दा लावून धरला होता. पुण्यात पुन्हा स्फोट झाल्यानंतर सीसीटीव्हीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. जंगली महाराज रोडवरच्या चार स्फोटानंतर पुण्यात महिनाभरात सीसीटीव्ही बसतील, अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. मात्र त्या कामाची सुरुवातही पुण्यात झाली नव्हती. 

पुण्यात स्फोट झाल्याच्या दिवशीच चंद्रपूरच्या वरोरा शहरातील दोन इमारतींवर आक्षेपार्ह मजकुर आढळून आला. इंडीयन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या नावाने एका खास धर्माच्या लोकांना लक्ष्य करण्याचे आवाहन करणा-या घोषणा लिहिलेल्या आढळून आल्या. हा कुणाचा खोडसाळपणा आहे की वरोरा शहरात या दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल आहेत यावर पोलीस लक्ष केंद्रीत करत आहेत.

वरो-याच्या उपविभागीय आणि तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयाच्या भिंतीवर हिरव्या रंगाने लिहिण्यात आलेल्या या आक्षेपार्ह मजकुरामुळे खळबळ उडालीये. पोलिसांनी लगेच या ठिकाणी पोहचून भिंतीवर रंग मारून हा संदेश मिटविला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.