पुणे : महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन किंवा उदघाटन कार्यक्रम राजशिष्टाचारात बसत असतील तरच करावेत, अन्यथा अशा कार्यक्रमांवर होणारा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला आहे.
अजित पवार यांचे फोटो छापण्यासाठी महापालिकेचे ५८ लाख रुपये खर्च करण्यात आले, असा आरोप गिरीश बापट यांनी केला आहे. बापट यांच्या भूमिकेमुळं महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील संघर्ष वाढत जाणार असल्याची चिन्ह आहेत.