पुणे: पुण्यात तुळशीबागेमध्ये जागेच्या वादातून रविवारी दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती... या मारामारीचं सीसीटीव्ही फूटेज आता हाती लागलंय. यात मनसेच्या नगरसेविका रुपाली पाटील यांनीही चांगलाच राडा घातल्याचं समोर आलंय.
दोन्ही बाजूकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असताना आता पोलिसांना सीसीटीव्हीचा पुरावा हाती लागलाय. तुळशीबागेमध्ये अजय लॉजशेजारी मोकळ्या जागेवर जागडे वाड्यातल्या मुलांची रसवंती होती. महापालिकानं हे अतिक्रमण हटवल्यावर अजय लॉजचे मालक अजय दराडे यांच्याशी संबंधित काही तरुणांनी स्टॉल लावल्याचा जागडे यांचा आरोप आहे.
रुपाली पाटील या दराडेंच्या नातलग आहेत. या जागेवरून वादावादी होताच पाटील यादेखील तिथं आल्या होत्या. या हाणामारीत आदित्य जागडे, कृष्णा जागडे, अमोल जागडे, नितीन लोहकरे हे जखमी झालेत.
पाहा या हाणामारीचा व्हिडिओ:
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.