बालगृहातच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संस्थेचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न निष्फळ

पुण्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. पुण्यातल्या एका बालगृहात अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार झाला... यातूनच ही मुलगी गरोदरही राहिली... मात्र, हे प्रकरण लक्षात आल्यानंतर मुलीला न्याय मिळवून न देता संस्था अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला.... आणि या मुलीचं तान्हुलं बाळ त्यांनी परस्पर निर्णय घेऊन दत्तक देऊन टाकलं.  

Updated: Aug 17, 2015, 11:25 PM IST
बालगृहातच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संस्थेचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न निष्फळ title=

पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. पुण्यातल्या एका बालगृहात अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार झाला... यातूनच ही मुलगी गरोदरही राहिली... मात्र, हे प्रकरण लक्षात आल्यानंतर मुलीला न्याय मिळवून न देता संस्था अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला.... आणि या मुलीचं तान्हुलं बाळ त्यांनी परस्पर निर्णय घेऊन दत्तक देऊन टाकलं.  

पुण्यातील या बालगृहात 'निहार' प्रकल्पांतर्गत अल्पवयीन मुलांचा सांभाळ केला जातो. मुख्यत: वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांचं पुनर्वसन इथं केलं जातं. पीडित मुलगी ही केवळ १३-१४ वर्षांची आहे. तिच्यावर संस्थेत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक जितेंद्र गोडे यानंच वारंवा अत्याचार केले. 

या संबंधातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. साहजिकच, हे प्रकरण तेव्हाच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं होतं. मात्र, या पीडित मुलीला न्याय मिळवून देणं लांबच राहिलं पण संस्थेची छी-थू होऊ नये यासाठी या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठीच जास्त प्रयत्न केल्याचं उघड झालंय. 

या घटनेचे पुरावे मागे राहू नयेत आणि कारवाई होऊ नये, यासाठी संस्थेनंच पुढाकार घेतला. गर्भवती पीडित मुलीला सांगलीतल्या एका हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं. तिथं पीडित मुलीनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. पण, पदाधिकाऱ्यांनी मात्र परस्पर निर्णय घेत हे बाळ दत्तकही देऊन टाकलं. 
 
सामाजिक कार्यकर्त्या अंजली पवार यांनी पुढाकार घेऊन हे प्रकरण उघडकीस आणलंय.  

दरम्यान, या प्रकरणी आरोपी जितेंद्र गोडे याच्यासह संस्थेच्या अधिक्षक, संचालक आणि सहाय्यक या पदांवर काम करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.